¡Sorpréndeme!

सुप्रिया सुळेंचा सेल्फी विथ खड्डा | Supriya Sule Selfie With Pit | Supriya Sule Latest

2021-09-13 348 Dailymotion

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार आणि माननीय शरद पवार ह्यांच्या कन्या सुप्रिया सुळे ह्यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी ट्विटरवरून शेअर केली आहे. महत्वाचे म्हणजे राज्याचे महसूल मंत्री व सार्वजनिक बाधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुप्रिया सुळेंनी टॅग केले आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील ह्यांनी 15 डिसेंबर पर्यंत राज्यात एक हि खड्डा दिसणार नाही अशी नवी डेडलाईन घोषित केली होती. खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी चंद्रकांत पाटील ह्यांनी दिलेल्या डेडलाईनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे ह्यांच्या ह्या सेल्फी ला महत्व प्राप्त झाले आहे, त्यांनी कात्रज- उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत सेल्फी काढले आहेत. सुप्रिया सुळेंच्या ह्या ट्विट खाली आता राज्यभरातून अनेक लोक खड्ड्यांसोबत सेल्फी काढून व्यथा मांडत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews